गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी…!

चिंतन-मंथनातून आशयगर्भ विषयाची मांडणी करीत, श्रोत्यांना आपल्यासोबत त्या विषयात घेवून जात, त्यांच्या काळजाला हात घालत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारी तर कधी हसवणारी तर कधी अंगारासारखी बेभान पेटवणारी, नव्या परिवर्तनाच्या लढाईला सिद्ध करणारी त्यांची शैली हर एकाला मंत्रमुग्ध करुन सोडणारी...! तितकीच विलक्षण प्रेरणा देणारी...!!!!

महाराष्ट्रात असा युवक सापडणार नाही ज्यांच्या संगणकामध्ये आणि हातातल्या मोबाईल मध्ये प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची व्याख्याने आढळणार नाहीत.

 

उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे संकेतस्थळ तुम्हाला तोच अनुभव देईल...!